शिंगणापूर:
शिगणापुर ( ता.करवीर) येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह पंचगंगा नदीत शिंगणापूर बंधाऱ्या जवळ आज आढळला. सुरज शिवाजी पाटील (वय ३५) रा.हरिप्रिया कॉलनी,शिंगणापूर असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे. पोलिसातून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी
सुरज पाटील हा शाहूपुरी, तीसरी गल्ली येथील एचडीबी या फायनान्स कंपनीमध्ये कामावर होता. शनिवार दि.१५ रोजी तो रात्री ८.३० वाजता आपल्या मोटरसायकलने घरी येण्यासाठी निघाला.कुटुंबियांना मी उशिरा घरी येणार असून तुम्ही जेवण करा असा फोनही केला होता. पण त्यानंतर सुरजचा फोन बंद लागत होता. यामुळे संपर्क होत नव्हता.सोमवारी दुपारी शिंगणापूर येथील बंधाऱ्याजवळ नदीपात्रात सुरजचा मृतदेह ग्रामस्थांना दिसला.पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढून पंचनामा करून शवविच्छेदना साठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. सुरजच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई वडील, दोन विवाहित बहिणी आहेत.