Saturday, December 6, 2025
Google search engine
HomePOLITICALमहापालिका निवडणूक एप्रिल- मे महिन्यात होण्याची शक्यता; चंद्रशेखर बावनकुळे

महापालिका निवडणूक एप्रिल- मे महिन्यात होण्याची शक्यता; चंद्रशेखर बावनकुळे

पुणे : एप्रिल किंवा मे महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतील अशी शक्यता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.  ते रविवारी पुणे येथे माध्यमांशी बोलत होते.  राज्यातील अन्य मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती राज्य शासनाने वकिलामार्फत दिली असून येत्या काही दिवसांत त्यावर निर्णय अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. 

बावनकुळे  म्हणाले, राज्यातील निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालय लवकरच निर्णय देईल. तसे झाल्यास तातडीने निवडणूक घेण्याची आमची तयारी आहे. विधानसभेत महायुतीने २३७ जागा जिंकल्या होत्या. आताही सर्व महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांवर महायुतीच विजयी होईल.  भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व कार्यशाळेनंतर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

धनंजय मुंडे यांनी  राजीनामा द्यावा किंवा नाही, हा मुंडे, अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांचा अंतर्गत प्रश्न  असल्याने मी त्यावर बोलणार नाही, आस म्हणत त्यांनी या प्रकरणावर अधिक भाष्य करणे टाळले. 

कोणतीही शासकीय योजना बंद पडणार नाही. लाडकी बहीण योजनेच्या व्याख्येनुसार लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाईल. महायुतीचे सरकार योजना बंद करणारे नसून नवनव्या योजना मांडणारे सरकार आहे. . लाडकी बहीण योजनेच्या व्याख्येनुसार लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाईल, असे ते म्हणाले. 

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News