यशस्वी ठरली तर जेतेपदाचा सामना दुबईत होणार आहे. जर रोहितची सेना अंतिम फेरीत पोहोचली नाही, तर अशा परिस्थितीत स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना लाहोरमध्ये खेळवला जाईल.
4 मार्च – उपांत्य फेरी 1, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
5 मार्च – उपांत्य फेरी 2, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
9 मार्च – अंतिम सामना – गद्दाफी स्टेडियम, लाहोर
यावेळी उपांत्य फेरीसह अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. म्हणजेच पावसामुळे उपांत्य फेरीतील 1 व 2 सामने पहिल्या दिवशी (4 व 5 मार्च) पूर्ण होऊ शकले नाहीतर दुसऱ्या दिवशी (5 व 6 मार्च) उर्वरित सामने होतील. तसेच अंतिम फेरीच्या सामन्याच्या बाबतीतही आहे. म्हणजेच पावसामुळे 9 मार्चला अंतिम सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर या स्थितीत उर्वरित सामना 10 मार्चला होणार आहे.