मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मिलिंद रेगे यांचे आज निधन झालं.वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळं क्रीडाविश्वात शोककळा पसरलीय. मुंबई क्रिकेटचा सच्चा कार्यकर्ता हरपला अशी भावना क्रिकेट जगतातून व्यक्त होत आहे.
मुंबई क्रिकेट संघटनेत त्यांनी निवड समिती सदस्य, मार्गदर्शकासह अनेक भूमिका पार पाडल्या होत्या. वानखेडे स्टेडियमच्या 50 व्या वर्धापण दिनानिमित्त पार पडलेल्या सोहळ्यात MCA कडून या स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या प्रथम श्रेणी सामन्यात ते मुंबई संघाचे सदस्य होते