Saturday, December 6, 2025
Google search engine
HomeEnvironmentरायगड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; भीतीचं वातावरण

रायगड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; भीतीचं वातावरण

रायगड जिल्ह्यात पेण, सुधागड तालुक्यात रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता सौम्य असली तरी नागरिकांमध्ये भीतींच वातावरण निर्माण झालं आहे. भूकंप नेमका कोणत्या कारणामुळे झाला अन् तेचा केंद्रबिंदु कोणता ? याबाबत अद्याप कोणताही माहिती मिळालेली नाही. रात्री लोक झोपेत असतानाच अचानक रायगड जिल्ह्यात भूकंपाचे हादरले जाणवले.अनेकांच्या घरातील भांडी वाजू लागली, खिडक्या,काचा हादरू लागल्या, त्यामुळे घाबरलेले नागरिक घराबाहेर पडले.

 पेणच्या तिलोरे, वरवणे  तसेच सुधागड तालुक्यातही महागाव, भोपेची वाडी, देऊळ वाडी, कवेळी वाडी भागात जमिनीला हादरे बसल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास रायगडमधील पेण आणि सुधाग तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवलं. यावेळी तहसीलदार तानाजी शेजाळ आणि सुधागड तहसीलदार उत्तम कुंभार यांनी गावांना भेट दिली आणि चर्चा करुन ग्रामस्थांना धीर दिला. 

पेण आणि सुधागडमध्ये जमिनीला हादरे बसून भू गर्भातून आवाज आला, घरातील भांडी हलली, इतर कुठलेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. पण अचानक आलेल्या भूकंपामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. हवामान विभागाच्या भूकंप मापन केंद्र किंवा संकेत स्थळावर याची नोंद नाही

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News