Friday, January 16, 2026
Google search engine
HomePOLITICALरेखा गुप्ता घेणार दिल्लीच्या मुख्यमंत्रि‍पदाची शपथ; लाडकी बहीण म्हणत, एकनाथ शिंदेंनी दिल्या...

रेखा गुप्ता घेणार दिल्लीच्या मुख्यमंत्रि‍पदाची शपथ; लाडकी बहीण म्हणत, एकनाथ शिंदेंनी दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रेखा गुप्ता आज दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांचा शपथविधी आज रामलीला मैदानावर होणार आहे. सकाळी अकरा वाजता शपथविधी सोहळ्यास सुरवात होणार आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण म्हणत आनंद व्यक्त केला आहे. 

आमची लाडकी बहीण दिल्लीत शपथ घेणार आहे, ही आनंदाची बाब आहे. यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो असं सांगत शिंदेंनी रेखा गुप्ता यांना शुभेच्छा दिल्या. 

आज रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. एक्सवर पोस्ट करत नरेंद्र मोदी यांनी रेखा गुप्ता यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत रेखा गुप्ता यांनी शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांचा २९५९५ मतांनी पराभव केला आहे. गुप्ता यापूर्वी दक्षिण दिल्ली नगर निगमच्या महापौर होत्या. विशेष म्हणजे त्यांची ही आमदारकीची पहिलीच टर्म आहे.

रेखा गुप्ता या मूळच्या हरियाणाच्या जुलाना येथील आहेत. त्यांचे वडील नोकरीच्या निमित्ताने दिल्लीला आले होते. तेव्हापासून त्यांचं संपूर्ण कुटुंब हे दिल्लीला स्थायिक झालं. कॉलेजमध्ये असतानाच रेखा गुप्तांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्क आला होता. त्यामुळं, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून रेखा गुप्ता यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना रेखा गुप्ता या दिल्ली विद्यापीठात सचिव म्हणून निवडून आल्या होत्या. रेखा गुप्ता यांनी एलएलबीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांचं संपूर्ण शिक्षण दिल्लीमध्ये झालं आहे. 

 दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. भाजपकडून दिल्लीतील २७ वर्षांची सत्तेची प्रतीक्षा संपवण्यासाठी जोरदार प्रचार करण्यात येत होता आणि त्यांना यशदेखील मिळालं.  दिल्लीत भाजप पक्षाने 48 तर आम आदमी पक्षाने 22 जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला यंदा सलग तिसऱ्या विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News