Saturday, December 6, 2025
Google search engine
HomeEntertainmentस्वरा भास्करचे 'छावा' बाबत वादग्रस्त विधान; म्हणतीय,'५०० वर्षांपूर्वीच्या काल्पनिक अत्याचारांवर लोक राग...

स्वरा भास्करचे ‘छावा’ बाबत वादग्रस्त विधान; म्हणतीय,’५०० वर्षांपूर्वीच्या काल्पनिक अत्याचारांवर लोक राग व्यक्त करतायत..

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या छावा चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद मिळत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम आणि त्यांचा मुघलांकडून झालेल्या  छळ पाहून अनेक प्रेक्षकांना चित्रपटगृहातच रडू कोसळले तर काही जण भावूक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. देशासह जगभरात या चित्रपटाचं कौतुक होत आहे पण अभिनेत्री स्वरा भास्करनं या चित्रपटासंदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे.

‘चेंगराचेंगरी होऊन भयावह मृत्यूंपेक्षा चित्रपटातील 500 वर्षांपूर्वीचा सीन पाहून भावूक होत असतील तर तो समाज मनाने आणि आत्म्याने मेलाय’, असं अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विट करत म्हटलं आहे. सध्या तिचं हे ट्विट चांगलेच चर्चेत आले असून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

छत्रपती संभाजी महाराजांचा मुघलांकडून छळ होताना दाखवण्यात आला आहे ते पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.चित्रपटानंतर लोकांच्या भावुक क्षणांचे काही व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अशातच स्वरा भास्करने चित्रपटाला मिळत असलेल्या लोकप्रियेतेवर वादग्रस्त टिप्पणी केली आहे. तिच्या या टिप्पणीवर युजर्सनीही चांगलाच समाचार घेतला आहे.

नेमकं काय म्हणालीय स्वरा भास्कर?

चेंगराचेंगरी आणि गैरव्यवस्थापनामुळे झालेल्या भयानक मृत्यूनंतर बुलडोझरने मृतदेह उचलले गेल. अशा परिस्थितीत, समाज त्या गोष्टीवर चिंता व्यक्त न करता ५०० वर्षांपूर्वी हिंदूंवर झालेल्या काल्पनिक अत्याचारांवर जास्त संताप व्यक्त करतोय. हा समाज मनाने आणि आत्मयाने मेलाय….असं अभिनेत्रीनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Oplus_131072

छावा हा चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलाय तर दिनेश विजन हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपटाला संपूर्ण भारतातून तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका निभावली आहे, तर अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारताना दिसत आहे. याशिवाय अभिनेता अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवर आधारित आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News