Saturday, December 6, 2025
Google search engine
HomeSocialछावा चित्रपटावरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता; राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा...

छावा चित्रपटावरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता; राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. पण या चित्रपटावरुन राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

अभिनेता विकी कौशल याने या या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. अभिनेत्याने साकारलेल्या भूमिकेची चर्चा सर्वत्र सुरु असतानाच राजेशिर्के घराण्याने चित्रपटातील एका सीनवर आक्षेप घेत दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.  

नेमकं प्रकरण काय?

चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर येथे असल्याची माहिती गणोजी आणि कान्होजी शिर्के औंरगजेबाला देतात. त्यानंतर संभाजी महाराजांना मोजक्या सैन्यसह मुघलांचं सैन्य संगमेश्वर येथे गाठतं. त्यानंतर संभाजी महाराजांना कैद करण्यात येतं आणि 40 दिवस अन्ववित अत्याचार करुन त्यांची हत्या करण्यात येते. दरम्यान, संभाजी महाराज मुघलांना सापडतात. चित्रपटातील या सीनमुळं राजेशिर्के घराण्याची बदनामी झाल्याचे वारसदारांनी म्हटलं आहे. 

राजेशिर्के घराण्याची बदनामी 

छावा चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली कान्होजी आणि गणोजी राजेशिर्के यांना खलनायक केलं. त्यामुळे राजेशिर्के घराण्याची बदनामी झाली. ही बदनामी खपवून घेतली जाणार नाही. या चित्रपटातील हा मजकूर काढून टाकवा आणि पुन्हा प्रदर्शित करावा अन्यथा आम्ही सगळ्या शहरातून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करू, अशा शब्दात राजेशिर्के यांच्या वारसदारांनी संताप व्यक्त केला आहे. 

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News