माझे बँक खाते तपासा; दमानियांचे प्रत्युत्तर
अंजली दमानिया यांनी सूरज चव्हाण यांचे आरोप धूडकावून लावत सरकारला थेट आपले बँक अकाउंट तपासण्याचे आव्हान दिले आहे.दुसरीकडे, अंजली दमानिया यांनी या प्रकरणी सरकारला आपले खाते तपासण्याचे खुले आव्हान दिले आहे. आपला संताप व्यक्त करताना त्या म्हणाल्या, ‘‘खूप राग आला आहे, तरीही मी माझ्या भाषेची पातळी सोडणार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांना माझा थेट आव्हान. ताबडतोब माझी सगळीच्या सगळ्या खाती सरकारने तपासावी. कुठेही एक दमडीदेखील बेनामी आहे का, ते पाहावे.’’
इतका अमाप भ्रष्टाचार होतोय आणि मी लढू नये? स्वतःच्या जिवाची पर्वा न करता लढणाऱ्या लोकांचा असा मानसिक छळ करणार? राजकारणात पुढे जाण्यासाठी, नेत्याला खुश करण्यासाठी खालच्या पातळीला जाऊन हे बोलतात ना? योग्य आहे हे? महाराष्ट्राच्या मीडियाला माझ्या लढ्याबद्दल जरा पण आदर असेल, तर अजित पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्यावर आजच्या आज प्रतिक्रिया घ्यावी. दोघांनाही माझी विनंती, माझ्या सगळ्या खात्यांची ताबडतोब चौकशी करावी. होऊन जाऊ दे. मी भ्रष्ट असेन तर मला शिक्षा झाली पाहिजे आणि नसेल तर मग ह्या सूरज चव्हाणला योग्य ती शिक्षा द्यावी, अशी आक्रमक भूमिका दमानिया यांनी घेतली आहे.