Friday, January 16, 2026
Google search engine
HomePOLITICALवाजपेयींचं सरकार पाडण्यामागं शरद पवारांचा हात; स्वतः च सांगितला "तो "किस्सा

वाजपेयींचं सरकार पाडण्यामागं शरद पवारांचा हात; स्वतः च सांगितला “तो “किस्सा

1999 साली अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार पाडण्यामागे नेमका कुणाच हात होता? पडद्यामागे नेमकी कोणती खेळी खेळीली गेली ज्यामुळं वाजपेयींचं सरकार पडलं? याच उत्तर स्वतः राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलं आहे. दिल्लीत पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवार बोलत होते. 

निलेशकुमार कुलकर्णी लिखित ‘संसद भवन ते सेंट्रल विस्टाः आटवणींचा कर्तव्यपथ’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी,  ‘केंद्रात पहिल्यांदाच भाजपा सत्तेत आली होती. अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान बनले होते. त्याच काळात विरोधी पक्षाने सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आणि केवळ एका मताने अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार पडलं होते.’ असं पवारांनी यावेळी सांगितलं.

नेमकं काय म्हणाले पवार?

माझ्या कारकिर्दीबाबत एक गोष्ट फार लोकांना माहिती नाही की मी संसदेत विरोधी पक्ष नेता होतो. माझ्या विरोधी पक्षनेत्याच्या काळात एक घटना घडली. तेव्हा अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं आणि त्यांचे सरकार असताना आम्ही विरोधी पक्षात त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मांडला आणि तो ठराव एक मताने मंजूर झाला.

तर ठरावासाठी एक मत कसं मिळवलं?

 यासंदर्भात बोलताना पवार म्हणाले, ते जे एक मत होतं ते मी मिळवलं होतं. कसं मिळवलं ते मी सांगत नाही. ठराव मांडला, चर्चा झाली आणि मध्ये जी वेळ असते त्या वेळेत मी बाहेर गेलो कोणाशी तरी बोललो आणि परत येऊन बसलो आणि सत्ताधाऱ्यांमधील एका व्यक्तीने काही वेगळा निर्णय घेतला आणि एका मताने ते सरकार पडलं आणि त्या वेळेला विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी ही माझ्याकडे होती, हा इतिहास आहे असा खुलासा शरद पवारांनी केला.

त्या एक मतासाठी ओडिशाच्या माजी मुख्यमंत्र्यांना धरले जाते जबाबदार

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची तुलना भारतातील दिग्गज नेत्यांमध्ये केली जाते. ते भारतातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधानांपैकी एक आहेत. अटलबिहारी वाजपेयी हे तीन वेळा पंतप्रधान झाले. परंतु त्यांचा पहिला कार्यकाळ केवळ 13 दिवस होते. तर दुसरा कार्यकाळ केवळ 13 महिन्यांचा होता त्यावेळी  एका मताने त्यांचं सरकार पडलं होतं.

वाजपेयी यांचे सरकार पडण्यासाठी ओडिशाचे माजी मुख्यमंत्री गिरीधर गोमांग यांना जबाबदार धरलं जाते. कारण त्यांनी वाजपेयी सरकारच्या विरोधात मतदान केले होते. लोकसभेत सरकारच्या बाजूने २६९ मते पडली होती. गिरधर गोमांग यांनी विरोधात मतदान केल्याने विरोधकांची मतांची संख्या 270 झाली. त्यामुळे फक्त एक मताने अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार पडलं होतं. 1998 च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. पण भाजपला 182 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. 

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News