महाराष्ट्र सीमे लगत असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिकांवर कन्नड भाषेची सक्ती आणि कन्नड रक्षक वेदिका या कानडी संघटनेकडून मराठी भाषिकांवर होणारे अत्याचार यामुळे मराठी भाषिक त्रस्त आहे. अशातच काल रात्री कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीला टार्गेट करत कर्नाटक हद्दीतील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील चित्रदुर्ग येथे एसटीला आणि एसटी कर्मचाऱ्याला कन्नड येतं का विचारत काळं फासलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झालीय आहे.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणि भाषावाद यामध्ये कोणतीही घटना घडली की पहिलं टार्गेट एसटी महामंडळाच्या गाड्या होतात. काल महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बेंगलोर मुंबई एस टी क्रमांक MH14 KQ 7714 ही एसटी चालक भास्कर जाधव चित्रदुर्ग येथून कोल्हापूरच्या दिशेने येत होते. यावेळी रात्री साडेनऊच्या सुमारास कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी अचानक एसटी अडवली. चालकास कन्नड येत का अशी विचारणा केली. कन्नड येत नसल्याचे सांगितल्यानंतर कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत चालकास एसटीतून खाली उतरवल आणि तोंडाला काळ फासत कन्नड येत नसेल तर कर्नाटकात येऊ देणार नाही अशी जोरदार घोषणाबाजी करू लागले. शिवाय एसटीला देखील काळं फासलं याची माहिती करतात महाराष्ट्रातून एसटी अधिकारी चित्रदुर्गच्या दिशेने रवाना झाले असून आज एसटी महाराष्ट्रात आणली जात आहे. मात्र या घटनेमुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून आम्हाला सुरक्षा मिळाली नाही तर आम्ही कर्नाटकात गाड्या घेऊन जाणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.