Friday, January 16, 2026
Google search engine
HomeAdministrativeशिंगणापूर जलजीवन मिशन कामामुळे हणमंतवाडी रस्तेचे काम रखडले ; हणमंतवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने...

शिंगणापूर जलजीवन मिशन कामामुळे हणमंतवाडी रस्तेचे काम रखडले ; हणमंतवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदन

शिंगणापूर:
हणमंतवाडी (ता करवीर ) येथील शिंगणापूर कमानीपासून ते  हनमंतवाडी पर्यंतच्या रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनास एक वर्ष होऊन गेले आहे पण अद्याप पिण्याच्या पाईपलाईनला जागोजागी गळती लागल्यामुळे रस्त्याचे काम रखडले आहे. ते त्वरित पूर्ण करण्यासाठी शिंगणापूर ग्रामपंचायतीस हनमंतवाडी ग्रामपंचायत कडून सरपंच रसिका पाटील यांना निवेदन देण्यात आले.
शिंगणापूर कमानीपासून हनमंतवाडी पर्यंतच्या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू आहे गेली चार महिने सदरचे काम रखडले तर पाईपलाईनच्या गळतीमुळे केलेली खुदाई व ती गळती वेळेत न काढल्यामुळे रस्त्याचे कंत्राटदार काम करण्यास तयार नाहीत यामध्ये हनमंतवाडी ची केएमटी बस बंद आहे. आणि रस्ता खराब असल्याने वडापही गावात येत नाही त्यामुळे शालेय विद्यार्थी महिला यांना शिंगणापूर कमानी पर्यंत एक किलोमीटर चालत जावे लागते . सदरचा रस्ता शिंगणापूर हद्दीत असल्याने हनमंत वाडीतील ग्रामपंचायत शिंगणापूर पंचायतला निवेदन देण्या आले . पण ग्रामस्थांचे गेले चार महिने हाल होत आहे. निवेदन दिल्यानंतर सरपंच रसीका पाटील यांचे पती अमर पाटील यांनीच काम पूर्ण करू अशी ग्वाही दिली.

याबाबत हनमंतवाडीचे सरपंच तानाजी नरके यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून पाईपलाईन व रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे असे सांगितले. यावेळी हनमंत वाडीचे  डे.सरपंच शिनगारे ,संग्राम भापकर यांचे सह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News