बालिंगा/(मोहन कांबळे प्रतिनिधी):
करवीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित कागल विधानसभा मतदार संघाच्या आमदार पदी सलग सहाव्यांदा व महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल नामदार हसन मुश्रीफ यांचा व करवीर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदी चंद्रदीप नरके यांची निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार सोहळा बालिंगे हायस्कूल पटांगणावर संपन्न झाला.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी शुभारंभ ही करण्यात आला. यावेळी महे गावचे लोकनियुक्त सरपंच सर्जेराव जरग यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी विविध क्षेत्रांमध्ये निवड झालेल्या मान्यवरांचे सत्कार मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ व करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी गोकुळचे संचालक युवराज पाटील (बापू), राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील – आसूर्लेकर, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा शितलताई फराकटे,संभाजी पाटील(भुयेवाडीकर) कार्यक्रमाचे आयोजक मधुकर जांभळे, शिवाजी देसाई, अरविंद कारंडे, कृष्णात पुजारी, युवराज पाटील, सविता खाडे, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, करवीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.