कोल्हापूर:
कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलात फायरमन पदावर कार्यरत असणारे भगवान शिंगाडे ( वय 58 वर्ष ) हे आपली नोकरी सांभाळून समाज उपयोगी उपक्रमात योगदान देत असतात याचाच भाग म्हणून येत्या 24 फेब्रुवारी 2025 रोजी श्री भगवान शिंगाडे विविध सामाजिक संदेश जसे की पर्यावरण वाचवा, प्रदूषण रोखा, प्लास्टिकचा वापर टाळा, जल जंगल जमीन बचाओ, बेटी बचाओ बेटी पढाओ यासारखे विविध संदेश प्रसार करण्यासाठी हा प्रवास करणार आहे. त्यांच्या प्रवासाची सुरुवात सायबर महाविद्यालयाच्या दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागाच्या विद्यार्थी व प्राध्यापकांच्या उपस्थितीत ते मार्गग्रस्त होणार असून या कामी त्यांना महानगरपालिकेच्या आयुक्त के मंजू लक्ष्मी व इतर प्रशासकीय यंत्रणेची व ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉयज फेडरेशन यांचे मार्गदर्शन व पाठबळ भेटले आहे