Friday, January 16, 2026
Google search engine
Homecrimeआर्थिक परिस्थितीला कंटाळून पुण्यात 21 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या..

आर्थिक परिस्थितीला कंटाळून पुण्यात 21 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या..

घरच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून एका एकवीस वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या करण्यासाठी पिंपरी-चिंचवड मधील संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकावरून वरून रस्त्यावर खाली उडी मारली. याच वेळात रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनाने त्याला चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला. सोमवारी (२४ फेब्रुवारी) सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली. सुजल संजय मनकर ( वय २१, रा. राजगुरुनगर,पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजल मनकर हा डी. वाय. पाटील महाविद्यालयात बीसीएस मधील शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याची घरची आर्थिक परिस्थिती काही कारणाने हलाकीची होत गेली. त्याने सोमवारी संध्याकाळी संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकावर प्लॅटफॉर्मवर प्रवेश केला. तेथील एका डक्ट मधून थेट खाली रस्त्यावर उडी मारली.

रस्त्यावर पडल्यावर त्याला एका वाहनाने चिरडले. स्थानकावरील नागरिकांनी ही घटना पाहताच आरडाओरडा केला. त्यानंतर त्याला तातडीने वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, सुजल याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात त्याने घरच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद केले होते.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News