इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. ‘छावा’ चित्रपटावर भूमिका मांडताना ब्राम्हणद्वेष पसरवल्याचा आरोप करत प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने फोनवरून धमकी दिल्याची माहिती इंद्रजीत सावंत यांनी फेसबुक पोस्टमधून दिली आहे. सावंत यांनी फेसबुकवर संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग पोस्ट केले आहे.
दरम्यान, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देऊन तुमची औकात दाखवली, हिशोबात रहा. संभाजी ब्रिगेड सावंत यांच्या सोबत आहे. त्यांच्या केसाला जरी धक्का लावाल तर, सोडणार नाही, गाठ संभाजी ब्रिगेड’शी आहे, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी दिला आहे.