इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. ‘छावा’ चित्रपटावर भूमिका मांडताना ब्राम्हणद्वेष पसरवल्याचा आरोप करत प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने फोनवरून धमकी दिल्याची माहिती इंद्रजीत सावंत यांनी फेसबुक पोस्टमधून दिली आहे. सावंत यांनी फेसबुकवर संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग पोस्ट केले होते .
सावंत यांनी दुपारी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेत मला whatsapp कॉलद्वारे जी धमकी आलेली आहे या संदर्भातील सर्व माहिती मी पोलिसांना दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि मराठा समाजासंदर्भात जे आक्षेपार्ह विधान केली आहेत, या संदर्भातली मुख्य तक्रार माझी आहे. मला धमकी आणि मारहाण करण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर मी तक्रार दिलेली नाही. समाजात द्वेष पसरवण्यासंदर्भात काहींचं कारस्थान सुरू आहे. असेही सांगितले. व मी झालेला घटनाक्रम सांगितलेला आहे, आता पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. पुरावा म्हणून मी जो मोबाईल क्रमांक, व्हाट्सअप नंबर आणि संभाषणाची क्लिप दिलेली आहे. त्याच्यावरून किमान पोलिसांनी तपास करणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्र्यांकडून धमकीची दखल..
या धमकीची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.