मंत्री प्रताप सरनाईक काय म्हणाले?

“एसटी महामंडळाच्याबाबतीत आणि राज्याच्या हिताच्या अनुषंगाने मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना एकनाथ शिंदे यांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत. त्या निर्णयात कोणताही बदल करण्यात येणार नाही. तसेच ज्या योजना एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेल्या आहेत त्या योजनेत देखील कोणताही बदल होणार नाही. तसेच एसटीच्या प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय देखील त्यांच्या कार्यकाळात झाला होता. तसेच ७५ वर्षांच्या पुढील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाचा निर्णय झाला होता. आता या निर्णयात कुठेही बदल होणार नाही”, अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.