आज दिल्ली विधानसभेचे अधिवेशन खूप गाजण्याची शक्यता आहे. आज 14 कॅगचे अहवाल सभागृहात मांडले जाणार आहेत. या अहवालांच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांच्या राजवटीत झालेला भ्रष्टाचार उघड होईल, असे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारचे म्हणणे आहे. या घडामोडींशी परिचित असलेल्या सूत्रांनी एएनआयला सांगितले की, अहवालांमध्ये विविध सरकारी कार्यक्रम आणि उपक्रमांचे ऑडिट आणि मूल्यांकन अहवाल समाविष्ट आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे अहवाल सादर केले जाणार आहेत
1. मार्च 2021 वर्षाचा राज्य वित्त लेखापरीक्षण अहवाल
2. 31 मार्च 2020 ते 2021 वर्षांतील महसूल, आर्थिक, सामाजिक आणि सामान्य क्षेत्रे आणि सार्वजनिक उपक्रमांचे अहवाल
3. 31 मार्च 2021 दिल्लीतील वाहनांच्या वायू प्रदूषणाचा प्रतिबंध आणि कामगिरी ऑडिट अहवाल
4. 31 मार्च 2021 वर्षासाठी काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांचा परफॉर्मन्स ऑडिट अहवाल
5. मार्च 2022 चा राज्य वित्त लेखापरीक्षण अहवाल
6. दिल्लीतील दारू पुरवठ्यावरील कामगिरी लेखापरीक्षण अहवाल
7. मार्च 2023 चा राज्य वित्त लेखापरीक्षण अहवाल
8. सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवांच्या व्यवस्थापनावरील कामगिरी लेखापरीक्षण अहवाल
9. दिल्ली परिवहन महामंडळाच्या कामकाजावर कॅगचा कामगिरी लेखापरीक्षण अहवाल
10. CAG चा 31 मार्च 2022 चा परफॉर्मन्स ऑडिट रिपोर्ट
सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, एकूण 14 अहवालांपैकी 4 अहवाल हे वित्त खाते आणि विनियोग (ऑटोनोमायझेशन) खात्याशी संबधीत आहेत, जे 2021-22 आणि 2022-23 साठी दिल्ली सरकारच्या लेखा नियंत्रकाने तयार केले आहेत. यापूर्वी, डिसेंबर 2024 मध्ये, दिल्लीचे उप राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी विधानसभेसमोर CAG अहवाल सादर करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल माजी मुख्यमंत्री आतिशी यांची निंदा केली होती, त्यामुळे त्यांनी 19-20 डिसेंबर रोजी विशेष सत्र देखील बोलावले होते.
माजी मुख्यमंत्री आतिशी यांना लिहिलेल्या पत्रात सक्सेना यांनी वैधानिक लेखापरीक्षण अहवाल विधिमंडळासमोर सादर करण्याच्या सरकारच्या घटनात्मक कर्तव्यावर भर दिला होता. सरकारी कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी हे अहवाल महत्त्वाचे आहेत, याची आठवण त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना करून दिली.
सीएम रेखा गुप्ता यांनी मागील सरकारवर लोकांच्या कष्टाच्या पैशाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे आणि त्यांना प्रत्येक पैशाचा हिशोब द्यावा लागेल असे म्हटले आहे.