Friday, January 16, 2026
Google search engine
HomeSocialघोडावत कंज्यूमर लिमिटेडच्या सीएसआर फंड आणि घोडावत फाउंडेशन यांच्या माध्यमातून 22 लाखांची...

घोडावत कंज्यूमर लिमिटेडच्या सीएसआर फंड आणि घोडावत फाउंडेशन यांच्या माध्यमातून 22 लाखांची विविध विकास कामे पूर्ण..

कोल्हापूर:  कुमार विद्या मंदिर, तमदलगे येथे घोडावत कंज्यूमर लिमिटेडच्या सीएसआर फंड आणि संजय घोडावत फाउंडेशन यांच्या माध्यमातून शाळेतील विविध विकासकामांचे हस्तांतरण सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात घोडावत कंज्यूमर लिमिटेडचे एमडी श्रेणिक घोडावत, डायरेक्टर सौ सलोनी घोडावत, डायरेक्टर राजेश घोडावत, आणि क्वालिटी आणि सस्टेनेबिलिटी हेड थिप्पेस्वामी पापारेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभात यशवंत पेठे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व परिचय केला. शाळेतील सुधारणा घोडावत कंज्यूमर लिमिटेडच्या सीएसआर फंडातून आणि तमदलगे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शक्य झाल्या आहेत. या उपक्रमाअंतर्गत शाळेची इमारत, कूलिंग सिस्टीम, शाळेची मैदानाची स्थिती सुधारली असून शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
श्रेणिक घोडावत यांनी विद्यार्थ्यांना संघर्ष करत असताना अपयशावर मात करून धैर्याने यश मिळवण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायक ठरल आहे. डायरेक्टर सौ सलोनी घोडावत यांनी मुलींना शिक्षणाच्या महत्त्वाबद्दल प्रोत्साहित करून मदतीसाठी घोडावत कुटुंब नेहमी तत्पर राहील असे आश्वासन या वेळी दिले आहे. गावातील उपसरपंच  पुरुषोत्तम शिरसेठ यांनी शाळेच्या विकासासाठी घोडावत कुटुंबाच्या योगदानाचे कौतुक केले व भविष्यात अशा योगदानांची अपेक्षा व्यक्त केली.
इएसजी मॅनेजर प्रवीण डिग्रजे यांनी कार्यक्रमात देशाच्या विकासासाठी शिक्षण व आरोग्य क्षेत्रात योग्य पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे महत्त्व या विषयी मार्गदर्शन करून घोडावत कंज्यूमर लिमिटेडने “फ्युचर फर्स्ट” या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून शाळेतील सुधारणा करण्यात आली असून  22 लाख रुपयांच्या कामांची पूर्तता पूर्ण केली आहे असी माहित दिली.

कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक अरुण नागरगोजे, विद्यार्थी, शिक्षकवृंद, सरपंच, उपसरपंच आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

विद्यापीठाचे अध्यक्ष संजयजी घोडावत यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News