जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी येथे लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला झाला आहे. या भागातून लष्कराचे एक वाहन जात होते. दरम्यान, दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी वाहनावर हल्ला केला. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी जंगलातूनच वाहनाला लक्ष्य करून गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल, लष्कराच्या जवानांनीही कारवाई केली आहे. संपूर्ण परिसराला वेढा घातला गेला आहे आणि दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला. हा हल्ला फहल गावात पाण्याच्या टाकीजवळ झाला. हे गाव सुंदरबनी मल्ला रोडवर वसलेले आहे.
नियंत्रण रेषेजवळील जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांनी वाहनावर ४ ते ५ राउंड गोळीबार केला. लष्कराच्या प्रवक्त्यानेही घटनेची माहिती दिली आहे, परंतु अद्याप कोणत्याही नुकसानीचे वृत्त नाही. सध्या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.