कोल्हापूर, दि. 27 : कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य सन 2024-25 अंतर्गत, सिंचन साधने व सुविधाबाबींतंर्गत 50 टक्के अनुदानावर पंपसंच व पाईपसाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे सोडत पध्दतीने 198 लाभार्थी शेतक-यांची (एकुण आर्थिक रक्कम रूपये 18,95,304/-) निवड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी दिली आहे.
तालुका व बाबनिहाय व तालुकानिहाय निवड झालेली लाभार्थी संख्या पुढीलप्रमाणे-
आजरा -14, गगनबावडा- 15, भुदरगड – 19, चंदगड- 15, गडहिंग्लज- 17, हातकणंगले- 22, कागल -15, करवीर -15, पन्हाळा- 18, राधानगरी-17, शाहूवाडी-14 , शिरोळ- 17 असे एकूण 198 लाभार्थी आहेत.
या योजनेंतर्गत पंपसंच व पाईपसाठी निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलवर लघु संदेश प्राप्त झाल्यापासून 10 दिवसाच्या आत महाडिबीटी पोर्टलव्दारे (https://mahadbtmahait.gov.in) ऑनलाईन पध्दतीने किंवा नजिकच्या कॉमन सर्व्हिस सेंटरव्दारे कागदपत्रे अपलोड करणे अपेक्षित आहे. त्यानंतर महाडीबीटी पोर्टलव्दारे कागदपत्रे छाननी करुन संबंधितास पुर्वसंमती मिळेल. पुर्वसंमती मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत पाईप / पंपसंचची खरेदी करुन लाभार्थ्यांनी देयके अपलोड करणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांच्याव्दारे मोका तपासणी करुन मार्गदर्शक सुचनेनुसार देयक अदायगीची पुढील कार्यवाही पूर्ण होईल. (देय अनुदान – पंपसंचसाठी प्रति संख्या र.रु. 10 हजार किंवा किंमतीच्या 50 टक्के जे कमी असेल ते, पाईपसाठी- लॅमिनेटेड ओव्हन, पीव्हिसी, एचडीपीईसाठी अनुक्रमे र.रु. 20 व र.रु.35/ व र.रु. 50 प्रति मीटर किंवा किंमतीच्या 50 टक्के यापैकी जे कमी असेल ते (प्रति शेतकरी र.रु. 15 हजार च्या मर्यादेत) याप्रमाणे देय राहील.)
तांत्रिक माहितीसाठी संबंधित तालुक्यातील कृषी विभागाशी तसेच गावपातळीवर कृषी सहायकांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांगरे यांनी केले आहे.