स्वारगेट एसटी बसस्थानकावरील शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणट गावचा रहिवासी आहे. तसेच त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी जबरी चोरीसह सात गुन्हे दाखल आहेत. आरोपीला पकडण्यासाठी पुणेपोलिसांनी आठ पथके तयार केली असून, त्याच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणावर तपास सुरू आहे.
दरम्यान, आरोपी गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर यापूर्वी चोरीसह 7 गुन्हे दाखल आहेत. आरोपीला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी आठ पथके तयार केली असून, त्याच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणावर तपास सुरू आहे.
माहिती देणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस
पुणे पोलिसांनी आरोपी दत्ता गाडे याला अटक करण्यासाठी नागरिकांची मदत मागितली आहे. आरोपीबद्दल माहिती देणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.