कोल्हापूर :
मराठी साहित्याचा मानदंड वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजेच “मराठी भाषा गौरव” दिन गुरुवारी डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट, कसबा बावडा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागाचे मंदार पाटील व महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर अजित पाटील यांच्या हस्ते वि. वा. शिरवाडकर च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पुस्तक प्रदर्शन व भिंती प्रदर्शन कक्षाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना मंदार पाटील म्हणाले मराठी भाषेला समृद्ध परंपरा लाभली आहे. मराठी भाषेने साहित्य क्षेत्रात खूप मोठे योगदान दिले आहे मराठी भाषेचा गौरव वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी मराठी साहित्याची आवड जोपासणे गरजेचे आहे.
यावेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ.अजित पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपल्या समृद्ध मराठी साहित्याचा वारसा आपल्या दैनंदिन आचरणामध्ये आणण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे नियोजन ग्रंथालय विभाग व नवीन शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत समिती विद्यार्थिनी गेले.
यावेळी डे. रजिस्टर अश्विन देसाई, ग्रंथपाल अक्षय भोसले, डॉ. नीलम जाधव,NVP समन्वयक डॉ.ओतारी सर व महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.