पन्हाळा : गेले काही महिन्यापासून पन्हाळा येथील अंगणवाडी समस्यांच्या गर्तेत अडकली आहे.
वारंवार नगरपरिषदेस निवेदन देऊनही अंगणवाडीतील मुलांना स्वच्छ पाणी ,बेबी टॉयलेट व मुतारी नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेली नाही. सद्यस्थितीत दोन अंगणवाड्या मध्ये साठ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
या समस्यांसाठी काल गुरुवारी मुलांच्या पालकांनी पन्हाळा नगरपरिषदेवर मोर्चा काढून मुख्याधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
येत्या सहा तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पन्हाळगडावर कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत तेव्हा त्यांचा ताफा अडवण्याचाही इशारा पालकांनी दिला आहे.