Wednesday, June 18, 2025
Google search engine
Homecrimeएक्सप्रेसच्या धडकेत आरपीएफ जवानाचा जागीच मृत्यू

एक्सप्रेसच्या धडकेत आरपीएफ जवानाचा जागीच मृत्यू

सोलापूर जिल्ह्याच्या जिंतूर रोड रेल्वे स्थानकाजवळ एक हृदयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी एका ड्युटीवर असणाऱ्या आरपीएफ जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संबंधित जवान जिंतूर रोड इथं पेट्रोलिंग करत होते, यावेळी अचानक समोरून आलेल्या एक्स्प्रेस ट्रेननं त्यांना उडवलं आणि अपघातात संबंधित जवानाचा जागीच मृत्यू झाला आहे.

ही अपघाताची घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे.  श्रीकांत वाघमारे (वय-४२,रा. कुर्डुवाडी) असं मृत पावलेल्या जवानाचं नाव आहे. ते माढा तालुक्यातील कुर्डूवाडी येथील रहिवासी असून आरपीएफमध्ये कार्यरत होते. श्रीकांत वाघमारे यांच्या पाश्चात आई पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. 

अधिक माहितीनुसार, ही घटना शुक्रवार (दि.२८) रात्री १० वाजताच्या दरम्यान घडली. घटनेच्या दिवशी ते नेहमीप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील जिंतूर रोड रेल्वे स्थानक परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी वेगानं आलेल्या केके (नवी दिल्ली-बंगळुरू)  एक्सप्रेसने त्यांना उडवलं. हा अपघात इतका भयानक होता की श्रीकांत यांचा जागीच मृत्यू झाला. एका तरुण जवानाचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याप्रकरणी दौंड लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. हा अपघात नेमका कसा घडला? त्यांना एक्स्प्रेस ट्रेन येताना कशी काय दिसली नाही? याचा तपास लोहमार्ग पोलीस करत आहेत. 

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News