Saturday, December 6, 2025
Google search engine
Homecrimeबनावट शाळेचा दाखला दिल्या प्रकरणी दोघांना अटक !

बनावट शाळेचा दाखला दिल्या प्रकरणी दोघांना अटक !

दिंडनेर्ली : (सागर शिंदे)
बनावट सही व शिक्याचा वापर करून शाळा सोडल्याचा दाखला तयार केल्याप्रकरणी अभिनंदन भिमराव परवाळकर (कडव कॉलनी,गारगोटी ता.भुदरगड) याचे वरती इस्पूर्ली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. तसेच त्याला बनावट शिक्का व दाखला करून देणाऱ्या गजानन जनार्दन पोवार (रा.नानीबाई चिखली ता.कागल) याला ही ताब्यात घेतले आहे.याबाबतची फिर्याद विद्या मंदिर गिरगाव (ता.करवीर) शाळेचे मुख्याध्यापक राजाराम बाबुराव जाधव यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी अभिनंदन परवाळकर याने मुलगीच्या शैक्षणिक कामासाठी खाटिक जातीचा दाखला गरजेचा होता.त्यामुळे त्यांनी आजोबा पिराजी यल्लाप्पा परवाळकर यांच्या नावाचा दाखला मिळविण्यासाठी विद्या मंदिर गिरगाव या शाळेच्या नावाचा बनावट दाखला तयार करून मुख्याध्यापकांची सही देखील खोटी केली होती. ऑगस्ट २०२४ मध्ये त्याने तो दाखला जात पडताळणी साठी सादर केला होता. जात पडताळणी कार्यालयातून चौकशी दरम्यान हा दाखला बनावट असल्याचे समोर आले.यानंतर मुख्याध्यापक यांनी पोलिसांत फिर्याद दिले नंतर अभिनंदन याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता गजानन पवार यांच्या मदतीने बनवून दाखला काढल्याचे कबूल केले. नानीबाई चिखली येथे गजानन पवार याची पत्नी महा-ई-सेवा केंद्र चालाविते याचाच गैरफायदा घेत परवाळकर याने पवार याच्या मदतीने मुलगीला शैक्षणिक लाभ मिळविण्याच्या हेतूने दाखला बनविला होता. बनावट दाखला प्रकरणात अजून किती लोक सामील आहेत, यापूर्वी अशा पद्धतीने किती जणांना दाखले दिले आहेत,यामध्ये रॅकेट आहे की काय याची चौकशी सहायक पोलिस उपनिरीक्षक मुद्दस्सर शेख करीत आहेत.

बनावट दाखला प्रकरणात गुन्हा दाखल होताच सहायक पोलिस उपनिरीक्षक मुद्दस्सर शेख यांनी राजकीय दबाव झुगारून तातडीने आरोपीला अटक करून सखोल चौकशी केली.चौकशी दरम्यान आरोपीला मदत करणाऱ्या पवार याला ही ताब्यात घेतले असून बनावट दाखला बनवणारे रॅकेट आहे काय, यापूर्वी असे बनावट दाखले किती जणांना दिले आहेत याच्या मुळापर्यंत जाणे गरजेचे आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News