Monday, November 10, 2025
Google search engine
Homecrimeशर्यती प्रकरणी वडणगे सरपंचांसह सदस्यांवर गुन्हा दाखल..

शर्यती प्रकरणी वडणगे सरपंचांसह सदस्यांवर गुन्हा दाखल..

कोल्हापूर – करवीर तालुक्यातील वडणगे येथे महाशिवरात्री निमित्त   वडणगे येथील ग्रामपंचायतने विनापरवाना बेकायदेशीररित्या घोडागाडी ,बैलगाडी आणि घोड्यावर बसून घोडा पळविण्याच्या शर्यतीचे आयोजन केले होते.कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांचा बंदी आदेश असताना त्याच प्रमाणे करवीरचे प्रांतिधिकारी यांची परवानगी घेतली नसताना शुक्रवार (दि.28 फ़ेब्रु) रोजी सकाळी नऊ ते पावणे बारा या दरम्यान  वडणगे येथील संघर्ष चौक ते निगवे व परत वडणगे या मार्गावर शर्यती घेतल्या प्रकरणी करवीर पोलिसांनी वडणगे येथील ग्रामपंचायतचे सरपंच सौ.संगीता शहाजी पाटील,उपसरपंच श्रीमती सरीता यशवंत लांडगे,सदस्य महेश शिवाजी सावंत,सौ.पद्मश्री संतोष  लोहार ,सौ.रेश्मा अमोल तेलवेकर ,जयवंत दगडू कुंभार ,उमाजी पांडूरंग शेलार ,सौ.राधीका संजय माने,संतोष बाबूराव नांगरे ,नितिन तुकाराम  साखळकर ,सतीश बाळासो पाटील,सौ.रुपाली विजय जौंदाळ,सौ.ज्योती चंद्रकांत नरके ,रोहित पां .पोवार ,संगीता मोहन नांगरे,ऋर्षिकेश अनिल ठाणेकर ,सौ.स्वाती यशवंत नाईक ,सौ.स्वप्नाली नितिन नाईक आणि बाजीराव (नाना)सदाशिव पाटील (सर्व रा.वडणगे) यांच्यावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याची फिर्याद सुहास रघुनाथ पोवार (पोहेकॉ.) यांनी करवीर पोलिस ठाण्यात दिली होती.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News