Saturday, December 6, 2025
Google search engine
Homecrimeगृहमंत्रालयाला ही सगळी घटना माहिती होती, सगळे फोटो माहिती होते, एवढे दिवस...

गृहमंत्रालयाला ही सगळी घटना माहिती होती, सगळे फोटो माहिती होते, एवढे दिवस कसे थांबले? धनंजय देशमुख

गृहमंत्रालयाला ही सगळी घटना माहिती होती, सगळे फोटो माहिती होते, एवढे दिवस कसे थांबले? माणसं आहे की कोण आहे? असं म्हणत धनंजय देशमुख यांनी गृहविभागावर सवाल उपस्थित केला. “सगळ्या महाराष्ट्राला माहितीये, आरोपी कोण आहे, यांना कोण सांभाळत होतं, यांनी सगळं आयुष्यच सगळे डील करत काढलं.  या संपूर्ण प्रकरणात 150 लोक आहेत. गृहमंत्रालयाच्या नाकावर टीच्चून आरोपी क्रमांक एक हजर झाला” अशा संतप्त भावना धनंजय देशमुख यांनी व्यक्त केल्या. नीच लोकांनी याचं समर्थन केलं, मोर्चे काढले, आंदोलन केले. यांना कधीच वाटलं नाही असं धनंजय देशमुख म्हणाले.

ADVERTISEMENT

सगळं मंत्रिमंडळ बरखास्त केलं, तरी माझ्या भावांना मारणाऱ्यांना मारलं तरच आम्ही त्यांच्याबद्दल बोलू, अन्यथा बोलणार नाही. आज आम्ही मरणाच्या दारात आल्यावर तुम्ही राजीनामा घेता का? असा सवाल संतोष देशमुख यांनी केला. मोठी मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करावा आणि आम्हाला सांगावं. आमच्या नाकावर टीच्चून सांगा, की आमच्या गावातला एकही माणूस सोडणार नाही असा संताप धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला.

 

संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करताना सीआयडीच्या हाती एक महत्त्वाचा व्हिडिओ सापडला आहे. या व्हिडिओमध्ये सहा आरोपी संतोष देशमुख यांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे. सहाही आरोपी अत्यंत क्रुरपणे संतोष देशमुख यांची कपडे काढून त्यांना मारहाण अमानुष मारहाण करत होते.सर्वात मोठी विकृती म्हणजे ही मारहाण सुरु असताना इतर आरोपी मोठमोठ्याने हसत त्यांच्या मारहाणीचा आनंद साजरा करत होते, असं या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलंय. धक्कादायक बाब म्हणजे, यावेळी एक व्हिडिओ कॉलही सुरु होता, जो जयराम चाटे याने एका वॉट्सअप ग्रुपवर केला होता. हा सर्वात मोठा डिजीटल पुरावा सीआयडीने सादर केला आहे. 

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News