पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये धुसफूस सुरुच असतानाच ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी मोठा निर्णय घेत पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. विशेष म्हणजे वाशिमचे पालकत्व स्विकारताना मुश्रीफ फारसे खुश नव्हते. कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी संधी न मिळाल्याने त्यांनी श्रद्धा, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. पण अखेर त्यांचा वाशिमध्ये जीव रमला नाही. त्यांनी प्रवास झेपेना म्हणत पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली.
प्रवास झेपेना…
हसन मुश्रीफ 26 जानेवारीला ध्वजारोहणासाठी वाशिमला गेले होते. त्यानंतर ते पुन्हा फिरकलेसुद्दा नाहीत अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, मंत्री म्हणून काम करताना कोल्हापूर, मुंबई, वाशिम असा सातत्याने 800 किमीचा प्रवास करण शक्य नसल्यामुळे पालकमंत्री पद मुश्रीफांनी सोडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुंळं त्यांची ही जबाबदारी लवकरच क्रीडा मंत्री दत्ता मामा भरणे घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
वाशिम जिल्हाला लागलेला झेंडा टू झेंडा पालकमंत्री हा डाग पुसू आणि जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा दिली जाईल, असे आश्वासन हसन मुश्रीफ यांनी दिले होते. मात्र, त्यांची घोषणा ही घोषणाच राहिली.
शेवटी मनात होत तेचं केलं?
सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली असून सह पालकमंत्री म्हणून भाजपच्या माधुरी मिसाळ यांना जबाबदारी देण्यात आली. पालकमंत्रीपदाच्या निवडीनंतर मुश्रीफांना उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती. ‘गेल्या वीस वर्षांपासून मी मंत्री आहे. या सर्वांमध्ये केवळ 14 मंत्री पालकमंत्री राहिलो आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेच्या मनातील पालकमंत्री मीच असल्याचे हसन मुश्रीफ यांनी त्यावेळी म्हटलं होते. तसेच, वाशिमचे पालकमंत्रीपद मिळाले ठीक आहे. तिन्ही पक्षांनी मिळून घेतलेला हा निर्णय आहे. श्रद्धा आणि सबुरी ठेवली पाहिजे. आता इलाज नाही. अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली होती.