Friday, January 16, 2026
Google search engine
HomePOLITICALधनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अन्न-नागरी पुरवठा खातं कोणाला मिळालं? अजित पवारांनी घेतला मोठा...

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अन्न-नागरी पुरवठा खातं कोणाला मिळालं? अजित पवारांनी घेतला मोठा निर्णय

नैतिकता आणि आजारपणाच्या कारण पुढे करत धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांचे रिक्त झालेल्या त्यांच्या मंत्रीपदाच्या जागी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच रिक्त झालेल्या अन्न-नागरी पुरवठा खात्यासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. 

धनंजय मुंडे यांनी मंगळवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खाते रिक्त झाले होते. अजित पवारांनी घेतला मोठा निर्णय घेतला आहे. 

अजित पवारांचा निर्णय काय?

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचा कारभार स्वत:कडे ठेवला आहे.

अजित पवार यांच्याकडे सध्या अर्थ आणि उत्पादन शुल्क खात्याचा कारभार आहे. यामध्ये आता  अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निमित्ताने तिसऱ्या खात्याची भर पडली आहे. मात्र, अजित पवार हा अतिरिक्त कार्यभार कधीपर्यंत सांभाळणार आणि या खात्याच्या मंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालणार याकडे सर्वांचे लक्ष आता वेधलं आहे. 

म्हणून अजित पवारांनी घेतलं स्वतःकडे खातं

 अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अनेक खात्यांसंदर्भात अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात येत असतात. त या खात्याशी संबंधित प्रश्न सभागृहात विचारले जाऊ शकतात. त्यामुळे अजित पवार यांनी तुर्तास या खात्याचा कार्यभार स्वत:कडे घेतल असल्याचे सांगण्यात येत आहे. 

भुजबळांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ? मुंडेंचा राजीनामा ज्येष्ठ नेत्याच्या पथ्यावर

मुंडे यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्री पदावरुन मुक्त करण्यात आलं आहे. त्यामुळं या मंत्रीपदावर कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. अशातच, नाराज भुजबळांचे नाव चर्चेत आलं असून आणखी एका आमदाराचं नाव समोर आलं आहे. 

राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक मंत्रिपद रिक्त झाले आहे. त्यामुळं राष्ट्रवादीच्याच एखाद्या आमदाराची वर्णी लागणार हे निश्चित आहे. पण हा आमदार कोण असेल अशी चर्चा सुरू असतानाच दोन नावे समोर आली आहेत. छगन भुजबळ यांच्यासोबत प्रकाश सोळंके यांच्या नावांचीही चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. 

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News