भुयेवाडी:
मादळे ता.करवीर येथील “बौधीकशा बहूउद्देशीय सेवाभावी संस्था,”व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या सहयोगाने मोफत सर्व रोग निदान शिबीर आणि रक्त तपासणीचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात 250 जणांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी करणेत आली. याप्रसंगी विश्वविजय दिग्विजय खानविलकर,संस्थेचे अध्यक्ष आमर पारमीत, संजय गांधी आनुदान समिती करवीर,सदस्य संभाजी पाटील,माजी सरपंच-बाबासाहेब भारतीय,विश्वकर्मा संस्थेचे अध्यक्ष-अमोल कुंभार,राष्ट्रवादीचे सूरज बागडे (निगवे दू।।),सादले सरपंच सचिन कांबळे,तंटामुक्त अध्यक्ष-उत्तम चौगले,डे,सरपंच-बूचडे,माजी सरपंच-दगडू कांबळे,अजीत कांबळे तसेच आदी ग्रामस्थ उपस्थित होते.