Wednesday, June 18, 2025
Google search engine
HomePOLITICALराज्य सरकारचा वीज ग्राहकांना मोठा दिलासा; राज्यात प्रीपेड मीटरवर बंदी

राज्य सरकारचा वीज ग्राहकांना मोठा दिलासा; राज्यात प्रीपेड मीटरवर बंदी

राज्य सरकारने मोठा निर्णय घेत वीज ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. प्रीपेड वीज मीटरवर बंदी घालण्यात आली असून आता  त्याऐवजी इलेक्ट्रॉनिक मीटर प्रणाली बसवण्यात येणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी ग्राहकांना दिवसा वीजवापरामद्ये 10 टक्के वीज शुल्कात सूट मिळणार असल्याचे सांगितलं. 

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

विक्रम काळे यांनी राज्यातील वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्री-पेड वीज मीटरबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. इलेक्ट्रॉनिक मीटर फीडरवर बसवण्यात आले आहेत. येत्या सहा महिन्यांत ते ट्रान्सफार्मरवर बसवण्यात येतील. त्यानंतर घरगुती मीटर बसवण्यात येतील. हा बदल अमलात आणण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

तसेच,  इलेक्ट्रॉनिक मीटर वापरणाऱ्या ग्राहकांना वीज वापरावर १० टक्के सवलत देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News