आदमापूर/प्रा.शिवाजी खतकर:
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, कोकण,गोवा व अन्य राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र आदमापूर (ता भुदरगड) येथील सद्गुरु संत बाळूमामा यांचा वार्षिक भंडारा उत्सव २० मार्च ते २८ मार्च २०२५ अखेर संपन् होत आहे.
त्यानिमित्त मंदिर,शिखर व मंदिरपरीसरातील स्वच्छता करण्यासाठी दि १०मार्च १४मार्च अखेर दर्शनासाठी मंदिर बंद ठेवले जाणार आहे.
बाळूमामांचा वार्षिक भंडारा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणार असून याची तयारी व नियोजन सुरू आहे .यामुळे मंदिर व परिसराची स्वच्छता करण्यासाठी मंदिरातील दर्शन सेवा बंद करावी लागणार आहे. यामुळे चार दिवस दर्शन सेवा व अन्नछत्र बंद राहणार असून भाविकांनी याची नोंद घेऊन मंदिर प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन अध्यक्ष धैर्यशील भोसले,सरपंच विजयराव गुरव व देवालय समितीच्या कार्याध्यक्षा रागिणी खडके यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.