संजय पोवार ( शिरोळ तालुका प्रतिनिधी ):
दत्तवाड: दिनांक ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन सर्वत्र मोठया उत्साहात साजरा केला गेला. दिन साजरे करताना आपण भोवतालच्या लोकांच्याकडे पाहात नाही.आज अनेक महिला कोणत्या ना कोणत्या संकटांशी झगडत असतात. त्या संकटांशी झगडतांना हताश होवून केविलवाण्या होवून इतरांच्याकडून मदतीची अपेक्षा करीत असतात.त्यापैकीच एका महिलेची ही करुण कहाणी.
आकिवाटे गल्ली घोसरवाड ता.शिरोळ जि.कोल्हापूर येथील मिलींद मोहन पोतदार वय वर्षे ४२ आपल्या २ मुलांसह १० बाय १०च्या २ खोलीत राहतात.परंतु गेल्या २ वर्षापासून किडनी उपचार सुरु झाल्याने संसाराचा डोलारा कोलमडला आहे.सध्या आठवडयातून ३ वेळा डायलिसिस करण्यात येत आहे.
वडीलोपार्जित २० गुंठे जमीन असून त्यांच्या पत्नी गृहिणी आहेत.दूध डेअरीतील भांडी विसळण्याचे काम करतात.मोठा मुलगा नरहरी सध्या डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे तर धाकटा मुलगा धैर्यशील हा आयटीआयच्या पहिल्या वर्षात शिकत आहे.आर्थिक उपचारासाठी मदतीची गरज पाहून महिनाभराची औषधे इचलकरंजीच्या मैत्री फाऊंडेशनचे चंद्रकांत छाजेड यांनी दिली आहेत. महिनाभराच्या औषधोपचारासाठी साधारणपणे १०,००० रुपयांची औषधे लागतात.
आतापर्यंत गावातील मित्रमंडळी, नातेवाईक,ग्रामस्थ यांनी औषधोपचारासाठी मदत केलेली आहे.आता त्यांना औषधोपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.तरी समाजातील दानशूर व्यक्ती,सेवाभावी संस्था यांच्याकडून आर्थिक मदतीची गरज आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने गरज आहे एका अबला,असहाय्य,निराधार महिलेला तिच्या सौभाग्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.
तरी सोबत दिलेल्या मोबाईल नंबर वर,गुगल पे- ९७ ६६ ७१ ६६ ४२ यांवर आपण मदत करुन खारीचा वाटा उचलून एक कुटुंब सावरू शकता.