हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने अखेर 12 वर्षांचा दुष्काळ संपला आहे. धोनीच्या नेतृत्वातील टीम इंडियाने 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले होते. त्यानंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 5 गडी राखून पराभव करत तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता ठरला आहे
त्याआधी टॉस जिंकून पहिली फलंदाजी करणाऱ्या किवींनी रवींद्रच्या चौफेर टोलेबाजीमुळे 10 षटकांत एक बाद 69 अशी वेगवान सुरुवात केली होती. भारतीय फिरकीने मग किवींच्या आक्रमक बॅटिंगला ब्रेक लावला. रचिन रवींद्रने 29 चेंडूत 37 धावांची जलद खेळी केली. केन विल्यमसन फक्त 11 धावा काढून बाद झाला, परंतु डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांच्यातील 57 धावांच्या भागीदारीमुळे न्यूझीलंडला सामन्यात परत येण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली. मिशेलने 63 धावा आणि फिलिप्सने 34 धावा केल्या. शेवटी, मायकेल ब्रेसवेलने नाबाद 53 धावा करत न्यूझीलंडला 251 धावांपर्यंत पोहोचवले



