कोल्हापूर:
कोल्हापूर जिल्ह्यातील अट्टल सराईत गुन्हेगार सौरभ काळू कोळी वय 22 राहणार कोरगावकर शाळेसमोर, सदर बाजार याच्यावर पोलिसांनी कारवाई करून एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्धतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला होता.
स्थानबद्धतेचा आदेश होऊनही तो पोलिसांना चकवा देत फिरत होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व हेड कॉन्स्टेबल विलास किराळेकर, शुभम संकपाळ, लखन सिंह पाटील, विशाल चौगले यांच्या खास पथकाने त्यास शोधून काढून एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध(एमपीडीए कायद्याअंतर्गत) केले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई,
उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अजित टिके यांच्या मार्गदर्शना खालील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, संतोष डोके, हवालदार संजय जाधव, विलास किरुळकर, अंमलदार शुभम संकपाळ ,लखन सिंह पाटील ,विशाल चौगुले यांनी ही कारवाई यशस्वी केली.