आदमापूर /प्रा.शिवाजी खतकर:
कौलगे ( ता.कागल) येथील परिवर्तन कीर्तन महोत्सवात सातारकर फडाच्या प्रमुख हभप भगवतीताई सातारकर यांची अत्यन्त प्रभावी,चित्ताकर्षण करणारी कीर्तनसेवा संपन्न झाली.
ह.भ.प. भागवतीताई सातारकर यांच्या अप्रतिम किर्तनाने अवघा रंग एक झाला.त्यांचे विवेचन अंतर्मुख व्हायला लावणारे व मार्मिक होते.त्या आपल्या किर्तन सेवेत म्हणाल्या जगताला वळण देण्यासाठी देवाने संत निर्माण केले.संत स्वानंद अनुभवाचे गाभे आहेत.तसेच संतांनी साहित्य सोनियाची खाण उघडली.
कीर्तन महोत्सव परिवर्तन संस्थेने आयोजित केला होता.
वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर यांच्या कन्या भागवतीताई व ताईंचे सुपुत्र हभप चिन्मय महाराज यांच्या कीर्तन सेवा यंदाच्या कीर्तन महोत्सवात आयोजित केल्या होत्या.या दोन्ही सेवानी श्रोत्यांना गायन,वादन व विवेचन यांची पर्वणी देऊन.सातारकर परंपरेच्या अप्रतिम गायनानेही श्रोते डोलले.
यावेळी..आनुर ग्रामस्थांच्या वतीने
भगवती ताई यांची पाद्यपूजा व सत्कार करण्यात आला.