Saturday, December 6, 2025
Google search engine
HomeSocialछत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनी रक्तदान शिबिराचे आयोजन !

छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनी रक्तदान शिबिराचे आयोजन !

कोल्हापूर:  स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या  बलिदान दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत याहीवर्षी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सेवाभावी फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या शिबिरात 45 रक्तदात्यांनी  उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान केले. वैभवलक्ष्मी ब्लड बँक, कोल्हापूर येथे हा कार्यक्रम घेण्यात आला.

 छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास समोर यावा म्हणून आयोजकांतर्फे राष्ट्रवीर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे पुस्तक रक्तदात्यांना भेट म्हणून दिले गेले.

या  रक्तदान शिबिरासाठी अनिल अडसुळे, राहुल वास्कर, निमिष देसाई, अभिजीत बोरगे,सुनील पाटील,सौरभ निकम, दिग्विजय सुतार यांसह  मोलाचे योगदान लाभले.या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News