वारणा दूध संघात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा
वारणानगर -श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह (4 मार्च ते 11 मार्च )विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.10 मार्च रोजी मुख्य दुग्धालयात डी. के. शिंदे कॉलेजच्या एम एस डब्ल्यू विभागाच्या विद्यार्थ्यांनी सुरक्षेची जाणीव या विषयावरती जागृती पर पथनाट्य सादरीकरण केले. संघातील कामगारांना काम करताना सुरक्षेची खबरदारी कशी घ्यावी याची माहिती मिळावी व दैनंदिन कामकाजात स्वतःबरोबर इतरांचीही काळजी घ्यावी या हेतूने राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह दूध संघात साजरा करत असल्याचे संघाचे प्रभारी कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी सांगितले.
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News



