कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यात ऐतिहासिक महत्व असणाऱ्या पन्हाळा किल्यावरील शिवस्मारकसाठी अजितदादांनी 5 कोटी दिले होते, मात्र शिवस्मारक विकसित करण्यासाठी आणि पन्हाळा किल्यावर महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा भव्य आश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी भरघोस निधी द्यावा अशी मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी केली.
विधानसभेत अर्थसंकल्प 2025 – 26 सर्वसाधारण चर्चेत आमदार चंद्रदीप नरके यांनी सहभाग घेतला. यंदाचा अर्थशंकल्प हा सर्वसमावेशक आहे. पायाभूत सुविधावर तसेच योजनांवर भर दिला आहे. वित्तीय तूट असूनही सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी 36000 कोटी रुपयांची तरतूद करून ही योजना बंद पडणार असे बोलणाऱ्या विरोधकांना चोख उत्तर दिले आहे. राज्य महामार्गाचा विचार करता करवीर विधानसभा मतदारसंघातील यवलूज ते आंबेवाडी मार्गे काटेभोगाव हार्दिक राज्य महामार्ग विकसित करावा त्याचप्रमाणे साखर कारखानदारांना दिलासा देण्यासाठी कोजनरेशन ला 6 रुपये दर करावा अशी मागणी आमदार नरके यांनी केली.
//अर्थसंकल्पमध्ये महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास, जोतिबा प्राधिकरण साठी निधी नसल्याने पुरवणी मागणीत समाविष्ट करून या दोन्ही तीर्थक्षेत्राना निधी देण्याची विनंती यावेळी चंद्रदीप नरके यांनी केली. साडेतीन शक्तीपीठापैकी एक असणाऱ्या महालक्ष्मीला देशभरातून लाखो भाविक दर्शनाला येतात लाखो भाविकांच्या या श्रद्धास्थानाला निधी द्यावा असे नरके यांनी नमूद केले.
हे महायुतीचे सरकार जनतेचे आहे. लाडकी बहीण योजना, किसान सन्मान योजना, साडेसात हॉर्स पॉवर ला वीज बिल माफ असो वा इतर योजना असो अशा सर्व योजनांना दीड लाख कोटीपेक्षा जास्त निधी दिला आहे त्यामुळे सर्वसमावेशक अर्थसंकल्प असे मत आमदार नरके यांनी व्यक्त केले.