Saturday, December 6, 2025
Google search engine
HomeSocialक्षेत्र आदमापूर येथील बाळुमामा भंडारा उत्सवासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज; २० मार्च पासून...

क्षेत्र आदमापूर येथील बाळुमामा भंडारा उत्सवासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज; २० मार्च पासून भंडारा यात्रेस प्रारंभ..

आदमापूर (प्रा.शिवाजी खतकर):
महाराष्ट्रासह कर्नाटक,आंध्र,गोवा,कोकण व अन्य राज्यभरातील लाखो भाविकभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता.भुदरगड )येथील सद्गुरु बाळूमामांचा वार्षिक भंडारा उत्सव गुरूवार ( दि.२० मार्च)ते मंगळवार (शुक्रवार दि२८ मार्च) अखेर संपन्न होत आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे बाळूमामांचा वार्षिक भंडारा उत्सव शांततेत व सुरक्षिततेत पार पाडा. असे आवाहन आजरा व भुदरगडच्या तहसीलदार अर्चना पाटील यांनी केले.त्या क्षेत्र आदमापूर ( ता.भुदरगड)येथील संत बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होत्या.
यात्रा उत्सव इत्यादी प्रसंगी होणाऱ्या गर्दीमुळे एखादी दुर्घटना टाळण्यासाठी शासनाकडील सुचना व उपाययोजनेचा भाग म्हणून व कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून उपविभागीय अधिकारी, आजरा-भुदरगड उपविभाग गारगोटी यांचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

श्रीक्षेत्र सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूर यांचा वार्षिक भंडारा उत्सव
बुधवार दिनांक २० मार्च ते शुक्रवार दि.२८ मार्च २०२५ अखेर संपन्न होत आहे.सदरचा वार्षिक भंडारा उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे .
या बैठकीस तहसीलदार अर्चना पाटील, भुदरगड पोलिस निरीक्षक,गटविकास अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी आरटीओ ,ग्रामसेवक बोंगार्डे सार्वजनिक बांधकाम विभाग प्रमुख ,भुदरगड,राधानगरी एस.टी.आगार प्रमुख,व ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
सद्गुरु बाळूमामां यांचा भंडारा उत्सवानिमित्त महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, गोवा ,आध्रप्रदेश या राज्यातील लाखो भाविक हजर राहतात. भंडारा उत्सव, अमावस्या व गुढीपाडवा या दरम्यान सर्व भक्तांना देवदर्शन, महाप्रसाद व पालखी सोहळा यात्रेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून दक्षता घेणेसाठी नियोजन बैठक पार पडली.
या बैठकीत सार्वजनिक आरोग्य,पिण्याच्या पाण्याची सोय ,वाहनांचे पार्किंग ,पोलिस बंदोबस्त भक्तांच्या सोयीसाठी भुदरगड व राधानगरी एस.टी.डेपोंनी व अन्य स्वयंसेवक यांची यंत्रणा सज्ज झाली आहे . उन्हाचा कडाका अधिक असल्याने देवस्थानने देवालयाच्या डाव्या बाजूला भव्य मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे.
याचबरोबर दुचाकी पार्किंग व चार चाकी वाहनांचे पार्किंग ज्या ठिकाणी बोर्ड लावण्यात आले आहेत. त्याच ठिकाणी वाहने उभी करण्याचे आवाहन केले आहे.
राज्यपरिवहन मंडळाने भक्तांच्या सोयीसाठी जादा बसची सुविधा उपलब्ध करून दिली असून उड्डाणपुलांच्या दोन्ही बाजूंना बसस्थानकाची सोय केली .
यात्रा काळातील तीन दिवस दिवसाचे स्थानिक न्यूज चॅनलच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण होणार आहे.
सदर बैठकीस बाळुमामा देवस्थानच्या प्रशासक प्रशासक रागिणी खडके, अध्यक्ष धैर्यशील भोसले, बाजार समिती माजी संचालक दत्तात्रय पाटील, सरपंच विजयराव गुरव, ग्रामसेवक पवन बोंगार्डे, तलाठी उमाकांत आदटराव, पाणी पुरवठा,वीज, बांधकाम विभाग उपअभियंता ,गोकुळचे माजी संचालक दिनकरराव कांबळे, देवस्थान समिती सदस्य, व्यवस्थापक, आदींसह ग्रामस्थ, पदाधिकारी उपस्थित होते.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News