दिंडनेर्ली प्रतिनिधी:( सागर शिंदे)
श्री. विठ्ठलराव जोशी चारिटी ट्रस्ट डेरवण यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अकराव्या डेरवण युथ गेम्स मध्ये इस्पूर्ली (ता.करवीर )येथील दूधगंगा पब्लिक स्कूल या शाळेच्या 14 वर्षाखालील फुटबॉल संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच ब्रिजेश माळी या खेळाडूला मॅन ऑफ द टूर्नामेंट म्हणून गौरविण्यात आले.
स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी: _ब्रिजेश माळी, नील गोसावी, विश्वजीत ढेंगे,शिवराज पाटील, श्रवण पाटील, प्रथमेश पाटील, सोहम पाटील, यश शिंदे, पृथ्वीराज हुंबे, वेदांत माजगावकर, श्रेयस नरूटे, ओंकार फाले._
सर्व खेळाडूंना फुटबॉल कोच सुशीलकुमार पाटील, संस्थेचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब राऊत सर, प्राचार्या सौ. मीरा राऊत मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.