Saturday, December 6, 2025
Google search engine
HomeSocialखुपीरे येथे शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन

खुपीरे येथे शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन

करवीर तालुक्यातील खुपीरे येथे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज प्रेमी यांच्यावतीने शिवकालीन शस्त्रे , जुने मुद्रांक, दस्तऐवज व नाण्यांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. शनिवार, २९ मार्च रोजी मारुती देवालय येथे सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत हे प्रदर्शन असणार आहे.

इतिहासप्रेमीना शिवकालीन शस्त्रांची, नाण्यांची माहिती मिळावी यासाठी शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले. ग्रामीण भागात असे प्रदर्शन पहिल्यांदाच होत आहे. इतिहासकालीन विविध आकाराच्या तलवारी, कट्यार, गुप्ती, चिलखत, जिरेटोप, उंदीर सापळा, कर्द, खंजीर अशा विविध प्रकारच्या शेकडो शस्त्रांचे प्रदर्शन मांडले जाणार आहे. तरी परिसरातील सर्व शिवप्रेमी, इतिहास प्रेमी तसेच नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News