Saturday, December 6, 2025
Google search engine
HomeSocialतानाजी च्या अकाली एक्झिट ने पाटील कुटुंबियांच्या आयुष्यातील रंग पडले फिके..

तानाजी च्या अकाली एक्झिट ने पाटील कुटुंबियांच्या आयुष्यातील रंग पडले फिके..

दिंडनेर्ली 🙁 सागर शिंदे)
पेंटींग च्या माध्यमातून इतरांच्या इमारतींना विविध रंगाची छटा देऊन कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील तानाजी बाळू पाटील(वय ३६ वर्षे)याच्या अकाली एक्झिट ने पाटील कुटुंबियांच्या आयुष्यातील रंग फिके पडले आहेत.बालवयातच पितृछत्र गेल्याने तीन वर्षाचा मोठा मुलगा व दीड वर्षाची जुळी मुलगा,मुलगी पोरकी झाली आहेत तर कुटुंबाचा आधारवड गेल्याने पत्नी,आई,वडील हताश होऊन बसली आहेत.
चित्रपटातील हिरो प्रमाणे मजबूत शरीरयष्टी,सहा फूट उंची,रंगाने गोरा असलेला तानाजी दहा दिवसापूर्वी रात्री घरी टिव्ही पाहत असताना अचानक खाली कोसळला.गावातील डॉक्टरांना दाखवले असता त्यांनी तात्काळ कोल्हापूरमध्ये नेण्यास सांगितले. क्षणाचाही विलंब न लावता त्याला तात्काळ कोल्हापूरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याची परिस्थिती नाजूक झाल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी ऑपरेशन ही केले. ऑपरेशन व्यवस्थित पार पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले पण तो शुद्धीवरती येणे गरजेचा होता. क्रिकेटचा प्रचंड शौकीन व अष्टपैलू खेळाडू असलेला तानाजी उपचारादरम्यान आयुष्याची अखेरची इनिंग लढत होता. डॉक्टरांच्या उपचाराला हळूहळू प्रतिसाद देत मोठ्या हिमतीने बॅटिंग करीत होता.तर त्याचे कुटुंबीय,नातेवाईक, मित्र परिवार तो बरा होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करीत होते.पण अखेर दहा दिवसाच्या उपचारानंतर गुरुवारी मध्यरात्री तानाजी क्लीन बोल्ड होऊन आऊट झाला तो कायमचाच.त्याच्या निधनाची बातमी सर्वत्र समजताच दिंडनेर्ली गावासह मित्र परिवारावरती शोककळा पसरली. पत्नी,आई,वडील,भाऊ यांनी फोडलेला हंबरडा व नातेवाईकांच्या कडेवर बसून गर्दीत निरागस नजरेने आपले वडील शोधणाऱ्या तीन लहान मुलांना पाहून उपस्थितींच्या डोळ्याच्या कडा ओलावत होत्या.
*चौकट :*
तानाजीच्या उपचाराचा आर्थिक खर्चही मोठा असल्याने त्याच्या मित्र परिवाराने एका दिवसात पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत जमा करून कुटुंबीयांना दिली.अजून खर्च वाढला तरी आम्ही मदत करतो पण तानाजी बरा झाला पाहिजे अशी भावना मित्रांनी व्यक्त केली होती.

कुटुंबाचा आधारवड गेला..
वयस्कर आई-वडील,पत्नी व लहान तीन मुले यांच्या सोबत तो राहत होता. पाच ते सहा कामगार हाताखाली घेऊन तो स्वतः इमारतींची पेंटिंगची कामे करत होता. तानाजीच्या निधनामुळे कुटुंबाचा आधारवडच गेला आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News