Saturday, December 6, 2025
Google search engine
HomePOLITICALपुणे - बेंगलोर हायवेवरील टोलवसुली तात्काळ बंद करावी - आमदार चंद्रदीप नरके...

पुणे – बेंगलोर हायवेवरील टोलवसुली तात्काळ बंद करावी – आमदार चंद्रदीप नरके यांची मागणी.

अधिवेशनामध्ये विधानभवनात आज करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी विविध विषयांसंदर्भात आवाज उठवत संबंधित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत किती किलोमीटरचे रस्त्यांचे काम होणार आहे याचा खुलासा व्हावा तसेच पुणे – बेंगलोर या नॅशनल हायवे क्रमांक चार वर सहापदरीकरणाचे काम अत्यंत धिम्यागतीने सुरु आहे या मार्गावर वाहतूककोंडी निर्माण होत आहे, त्यामुळे पुणे ते कोल्हापूर प्रवास 6 तास लागत आहेत, याचा या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना अतोनात त्रास होत आहे. काम सुरु असल्याने नागरिकांना कोणत्याही पायाभूत सुविधा या मार्गावर उपलब्ध केल्या जात माहित मग या मार्गावर टोल वसुली का केली जात आहे? या मार्गावर टोल वसुली थांबवून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नरके यांनी केली. त्याचप्रमाणे रत्नागिरी – कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर भूसंपादनासाठी पूर्वी चारपट रक्कम दिली जात होती मात्र नव्या नियमानुसार आता शेतकऱ्यांना फक्त दुपट्ट रक्कम दिली जात आहे हे थांबवून पूर्वीप्रमाणे चारपट रक्कम द्यावी आणि याच मार्गावर केर्ले पडळवाडी लांबीचा रस्ता सोडून होणाऱ्या बायपासला निधी मिळावा अशी मागणी यावेळी नरके यांनी केली. कोल्हापूर येथे प्रस्तावित खंडपीठचा विषय तात्काळ मार्गी लावून 5 जिल्ह्यातील नागरिकांच्या मागणीची पूर्तता करावी असेही नरके यांनी यावेळी नमूद केले. शक्तीपीठ महामार्ग हा कोल्हापूर येथून ज्या भागातून प्रस्तावित आहे, ती जमीन अतिशय सुपीक आहे त्यामुळे तुटपुंज्या नुकसानभरपाईवर या जमीनी अधिग्रहित करणे अवघड जाईल या बाबीकडे आमदार नरके यांनी लक्ष वेधले. कोल्हापूर शहर परिसरातील ग्रामीण भागासाठी निर्माण केलेल्या नागरी विकास प्राधिकरणाला निधी दिला गेला नाही, यासाठी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे नगरविकासमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक लावूनया प्राधिकरणासाठी निधीची तरतूद करावी आदी विषयांवर आमदार चंद्रदीप नरके यांनी विस्तृतपणे सभागृहात चर्चा केली.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News