Saturday, December 6, 2025
Google search engine
Homecrimeवारणा नदीत बुडालेला 21 वर्षीय तरुण आदित्य दाभोळकर याचा मृतदेह सापडला

वारणा नदीत बुडालेला 21 वर्षीय तरुण आदित्य दाभोळकर याचा मृतदेह सापडला

वारणानगर प्रतिनिधी: 

पन्हाळा तालुक्यातील वारणानगर इथल्या निवृत्ती कॉलनीमध्ये राहत असलेला आदित्य दीपक दाभोळकर हा 21 वर्षीय तरुण त्याच्या इतर दोन मित्रांसोबत वारणा नदीवरील चिकुर्डे धरण येथे पोहोचण्यासाठी गेला होता .धरणावरून नदीपात्रात उडी मारल्यानंतर तो काही अंतर पाहून गेला आणि पाण्यातील भवऱ्यामध्ये अडकल्यामुळे त्याला पुन्हा नदीपात्रातून बाहेर येता आलं नाही .की बाब त्याच्या मित्रांना लक्षात येतात त्यांनी त्याचा शोधा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत आदित्य हा नदीपात्रामध्ये वाहून गेला होता. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न त्याच्या मित्रानी केला परंतु तो अद्याप आढळून आला नव्हता. आज सकाळपासून कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सांगली जिल्ह्यातील हेल्पलाइन इमर्जन्सी रेस्क्यू फाउंडेशन च्या वतीने शोध मोहीम राबवण्यात आली होती सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आदित्य याचा मृतदेह सापडला.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News