आदमापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्रासह. कर्नाटक,आंध्र,गोवा,कोकण व अन्य राज्यभरातील लाखो भाविकभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता.भुदरगड )येथील सद्गुरु बाळूमामांचा वार्षिक भंडारा उत्सव गुरूवार ( दि.२० मार्च)ते मंगळवार (शुक्रवार दि२८ मार्च) अखेर संपन्न होत असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.आज गुरुवार दि २० मार्च पासून यात्रेस प्रारंभ झाला आहे .विविध धार्मिक कार्यक्रम असे – गुरुवार (दि.२०) ते शुक्रवार (दि. २८) मार्चअखेर यात्रा संपन्न होणार आहे. गुरुवारी (दि.२०) सायंकाळी ७ वाजता बाळूमामा देवालय ट्रस्टचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांचे हस्ते वीणापूजन होईल, आरती, समाधी पूजन, काकडा, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन व रात्री ११ ते पहाटे ४ हरिजागर होईल. दररोजचे प्रवचनकार व कीर्तनकार असे : गुरुवारी (दि.२०) ह.भ.प.अशोक कौलवकर (गारगोटी) यांचे सायंकाळी ६ वाजता प्रवचन, रात्री ९ वाजता ह.भ.प. नानासो पाटील महाराज (आदमापूर) यांचे कीर्तन शुक्रवार (दि.२१) रोजी रणजित भारमल महाराज (अवचितवाडी) यांचे प्रवचन तर ह.भ.प. अर्जुन जाधव महाराज (तवंदी शिप्पूर) यांचे कीर्तन होईल. शनिवारी (दि.२२) सायंकाळी ह.भ.प. विनय कुलकर्णी (मुरगूड) यांचे प्रतत्चन तर रात्री हभप विष्ण खोराते महाराज (सरवडे) यांचे कीर्तन, रविवारी (दि.२३) ह.भ.प. पुंडलिक गवळी (औरनाळ) यांचे प्रवचन तर ह.भ.प.मारुती देवडकर (यमगे) यांचे कीर्तन, सोमवारी (दि.२४) ह.भ.प. नानासो पाटील महाराज (आदमापूर) यांचे प्रवचन तर ह.भ.प. बाळकृष्ण गिरी महाराज (कूर) यांचे कीर्तन, मंगळवारी (दि. २५) रामचंद्र द. पाटील महाराज (आदमापूर) यांचे प्रवचन, भानुदास रामचंद्र कोल्हापुरे महाराज (इस्लामपूर) यांचे कीर्तन, बुधवार (दि.२६) मृत्युंजय स्वामी (शेंद्री) यांचे प्रवचन तर ह.भ.प. बाळकृष्ण परीट महाराज (हनिमनाळ यांचे कीर्तन होणार आहे. रात्री जागर असून गुरुवारी (दि.२७) पहाटे ४ ते ६ पर्यंत वाघापूर येथील कृष्णात डोणे महाराज यांची भाकणूक. सकाळी १० वाजल्यापासून काल्याचे किर्तन व अभंग त्यानंतर महाप्रसाद होणार आहे. शुक्रवारी (दि.२८) सकाळी ९ वाजता पालखी सोहळा होऊन दुपारी ४ वाजता सांगता भंडारा यात्रेची सांगता होईल. यात्रा शांततेत व सुरक्षितेत पार पाडण्यासाठी भाविक, ग्रामस्थ, विविध संस्था, व्यावसायिक,व्यापारी, कर्मचारी तरुण मंडळे, विविध विभागांचे पदाधिकारी यांनी सहकार्य करावे असे आवाहन बाळूमामा देवालयाचे अध्यक्ष धैर्यशील भोसले,कार्याध्यक्षा रागिणी खडके व व सरपंच विजयराव गुरव यांनी केले आहे.