Saturday, December 6, 2025
Google search engine
HomeSocialतानाजीच्या मुलांना ज्ञानहिराई उद्योग समूहाने दिला मदतीचा हात..

तानाजीच्या मुलांना ज्ञानहिराई उद्योग समूहाने दिला मदतीचा हात..

दिंडनेर्ली ( सागर शिंदे):
दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील तानाजी बाळू पाटील(वय ३६)याच्या अकाली एक्झिट झाली.बालवयातच पितृछत्र गेल्याने तीन वर्षाचा मोठा मुलगा व दीड वर्षाची जुळी मुलगा मुलगी पोरकी झाली.घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पोरक्या झालेल्या तिन्ही मुलांचे भवितव्य अंधारमय झाले असे वाटत असतानाच गावातील प्रतिष्ठित नागरिक विलासराव ज्ञानू पाटील व ज्ञानहिराई उद्योग समूहाचे प्रमुख माजी उपसरपंच सुरेशराव विलासराव पाटील यांनी तीनही मुलांच्या 10 वी पर्यंतच्या सर्व शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारली आहे. अडचणीच्या वेळी ज्ञानहिराई उद्योग समूहांने दिलेल्या मदतीच्या हाताने तीनही मुलांचे शैक्षणिक भविष्य उज्वल होईल यात काही शंकाच नाही.
तानाजीच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे ऑपरेशन केले होते.ऑपरेशन व्यवस्थित पार पडले पण उपचारादरम्यान तानाजी ची प्राणज्योत मालवली.तानाजीच्या उपचाराला ही खर्च मोठा झाला होता.कुटुंबाचा आधारवड गेल्याने
वयस्कर आई-वडील,पत्नी हताश झाले असताना समाजातून दानशूर लोकांनी हातभार लावणे गरजेचे होते. अशातच विलासराव पाटील व त्यांचे चिरंजीव माजी उपसरपंच सुरेशराव पाटील यांनी पुढाकार घेऊन फूल ना फुलाची पाकळी म्हणून मुलांची शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारली आहे ती मोलाची ठरणार आहे.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News