वारणानगर प्रतिनिधी:
पन्हाळा तालुक्यातील पोर्ले येथे येथे झालेल्या दोन मोटरसायकल अपघातात कोडोली येथील अजय गायकवाड या तरुणाचा डोक्याला मार लागल्याने जागीच मृत्यू झाला आहे तर शाहूवाडी तालुक्यातील नांदारीपैकी विचारवाडी येथील राजाराम भिकाजी विचारे हा तरुण जखमी झाला आहे.
अजय पोपट गायकवाड (वय वर्ष ३४ राहणार कोडोली)हा बिल्डिंग रंगावण्याचे काम (पेंटिंग)करत होता. स्वभावाने मनमिळाऊ अजय पन्हाळा तालुक्यातील कळे या मामाच्या गावी दोन-तीन दिवस राहण्यासाठी गेला होता. आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तो मामाची मोटर सायकल घेऊन कोडोली या आपल्या गावी परत येत असताना पोर्ले या ठिकाणी दोन मोटर सायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात आज अजय याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर राजाराम विचारे हा जखमी झाला . अजय गायकवाड याच्या पाठीमागे त्याचे आई-वडील,एक विवाहित बहीण, बायको आणि दोन वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. अजयच्या अपघातीने निधनाने कोडोली तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे